शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

स्टेमसेल्स साठवण्याची कंपनी अाहे असे सांगून ६६० जणांना गंडा घालणारा न्यायालयास शरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 2:06 PM

भविष्यात होणा-या आजारापासून संरक्षण देण्यासाठी नवजात बाळाच्या नाळेतील रक्त प्रीझर्व्ह (स्टेमसेल्स) करून ठेवणापी बायोटेक कंपनी बंद करून पसार झालेला ठग अखेर न्यायालयास शरण आला आहे.

पुणे : भविष्यात होणा-या आजारापासून संरक्षण देण्यासाठी नवजात बाळाच्या नाळेतील रक्त प्रीझर्व्ह (स्टेमसेल्स) करून ठेवणापी बायोटेक कंपनी बंद करून पसार झालेला ठग अखेर न्यायालयास शरण आला आहे. त्याने आत्तापर्यंत ६६० जणांची २६ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.         डॉ. चैतन्य अरुण पुरंदरे (वय  ४८, रा. हरेकृष्ण मंदिर रस्ता, मॉडेल कॉलनी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी यापुर्वी कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. आरोपी २०१६ साली कंपनीची जागा आणि नाळ जतन करायचे बंद साहित्य विकून पसार झाला होता. याबाबत स्मिता गोपाल तिजुरी (वय ६०, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार डॉ. चैतन्य पुरंदरे याच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पुरंदरे यांने अटकपुर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने त्यास पुणे न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याला बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक यु. एच. माळी यांनी दिली. 

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, पौड रस्त्यावरील शिला विहार कॉलनी येथे सुदर्शन अपाटमेंटमध्ये डॉ. चैतन्य कॉर्ड लाइफ बायोटेक कार्यालय होते. २७ मे २००८ ते २ जून २००८ या कालावधीत फिर्यादी यांची मुलगी डिलेव्हरीसाठी स्वारगेट येथील पाटणकर नर्सिंग होम्स येथ दाखल झाली होती. त्या वेळी त्यांचा विश्वास संपादन करून डॉ. चैतन्य पुरंदरे आणि त्याच्या साथीदार महिलांनी स्टेमसेल्सबद्दल त्यांना माहिती दिली. तुमच्या बाळाच्या नाळेतील रक्त प्रीझर्व्ह केले जाईल. भविष्यात त्याला कोणतेही आजारपण आले, तर त्यावर औषध शोधता येऊ शकते. त्यामुळे त्याला संरक्षण मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांच्याकडून ६५ हजार रुपये घेण्यात आले. तिजुरी यांनी स्टेमसेल्स बद्दल चौकशी केली नाही. दरम्यानच्या काळात डॉ. चैतन्य कॉर्ड लाइफ बायोटेकचे कार्यालय बंद करण्यात आले. याबद्दल तिजुरी यांना कळविण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. पुरंदरेने गाशा गुंडाळल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांनी कोथरूड पोलिसांना अर्ज दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

साठवलेल्या ६६० स्टेमसेल्स खराब आरोपींनी साठवलेल्या ६६० स्टेमसेल्स खराब झाल्याचा अहवाल नॅशनल केमीकल एक्सपर्टने दिला आहे. स्टेमसेल्स घेतल्यापासून त्या २१ वर्ष जतन करण्याचा करार आरोपी आणि स्टेमसेल्स देणा-या व्यक्तींत झाला होता. मात्र त्यापुर्वीच पुरंदरे यांचे भिंग फुटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHealthआरोग्यCourtन्यायालय