शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका महिला अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:12 IST

तक्रारी नंतर देखील संबंधित पदाधिकारी कार्यालयात येऊन त्रास देत असल्याने महिलेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे

पुणे : भारतीय जनता पक्षाचा (भाजप) एक पदाधिकारी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत असल्याची तक्रार महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाकडे केली आहे. यापूर्वीही या पदाधिकाऱ्याची सुरक्षा विभागाने पोलिसात तक्रार केली आहे. भाजपच्या नेत्यांकडेही तक्रार केली आहे. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नाही. दरम्यान, महिला आयोगाने या तक्रारीची दखल घेतली असून महापालिकेकडून माहिती घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या एका आघाडीचा शहराध्यक्ष सोबत दहा ते पंधरा कार्यकर्ते सोबत घेवून महापालिका भवनात येतो. अनेकवेळा महापालिकेच्या प्रवेशद्वारापासूनच हे लोक घोषणाबाजी करत व गोंधळ घालत आतमध्ये येताना दिसतात.

याबाबत संबंधित महिलेने जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. काम करताना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली होती. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडेदेखील तक्रार दिली होती.या तक्रारीवर समितीसमोर सुनावणी झाली. मात्र, पुढे नक्की काय कारवाई झाली, हे समितीकडून कळविण्यात आले नाही, अशी तक्रार या महिला अधिकाऱ्याने केली. तक्रारी नंतर देखील संबंधित पदाधिकारी कार्यालयात येऊन त्रास देत असल्याने महिलेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात महापालिकेला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून तसेच महापालिकेतील इतरांकडून माहिती देखील घेतली आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.

आरोग्य विभागातील दोन महिला अधिकाऱ्यांची तक्रार समितीकडे आली होती. त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठवून समितीने आवश्यक त्या शिफारशी केल्या आहेत.- डॉ. कल्पना बळीवंत अध्यक्ष, अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेRupali Chakankarरुपाली चाकणकरWomenमहिलाstate women commissionमहाराष्ट्र राज्य महिला आयोगPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका