४ आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: September 1, 2015 03:56 IST2015-09-01T03:56:15+5:302015-09-01T03:56:15+5:30

तळेरान वसईवाडी (ता. जुन्नर) येथे गुरे चारण्याच्या कारणावरून ६५ वर्षे वयाच्या वृद्धाला काठीने, कुऱ्हाडीने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने या वृद्धाचा मृत्यू झाला

The accused filed a murder charge against 4 accused | ४ आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल

४ आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल

मढ/ओतूर : तळेरान वसईवाडी (ता. जुन्नर) येथे गुरे चारण्याच्या कारणावरून ६५ वर्षे वयाच्या वृद्धाला काठीने, कुऱ्हाडीने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने या वृद्धाचा मृत्यू झाला. ४ आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.
या मारहाणीत विठ्ठल रामा साबळे (वय ६५, रा. तळेरान वसईवाडी, जुन्नर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याने साबळे यांचा मुलगा बुधा विठ्ठल साबळे (वय २७, रा. तळेरानची वसईवाडी, ता. जुन्नर) याने मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. ओतूर पोलिसांनी या चौघांवर भा. दं. वि. ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुरे चारण्याच्या कारणावरून भांडण काढून साबळे यांना जिव मारूण्याच्या प्रयत्न केला़ साबळे यांच्या डोक्याला व डाव्या पायाला मोठी जखम झाली. डावा हात व उजवा पाय मोडून पाठीला व पोटाला मुका मार लागला.
साबळे हे मंचर (ता. आंबेगाव) येथे उपचार चालू असताना रविवारी मरण पावले. अर्जुन मोतीराम घोडे, हरिभाऊ शिवराम घोडे, आंधळा शिवराम घोडे, हरिभाऊचा भाचा (पूर्ण नाव माहीत नाही. सर्व रा. तळेरान, बोरेची वाडी, ता. जुन्नर) यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई व सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बजरंग बाडीवाले, पो. कॉ. जी. एन. खत्री करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The accused filed a murder charge against 4 accused