शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सभापतींचे खातेवाटप नियमबाह्य

By admin | Updated: April 15, 2017 03:43 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी विषय समिती सभापती निवडीनंतर त्यांना केलेले खातेवाटप बेकायदेशीर कामकाज करून केले आहे, असा आरोप शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई

पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी विषय समिती सभापती निवडीनंतर त्यांना केलेले खातेवाटप बेकायदेशीर कामकाज करून केले आहे, असा आरोप शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी केला होता. तसेच, अधिकार नसतानाही अध्यक्षांनी एकतर्फी घोषणा करून हा निर्णय केला असून, त्यात प्रशासनही सामील असल्याचा आक्षेप घेऊन अपील अर्ज विभागीय आयुक्तांकडे दाखल केला होता. त्यामुळे आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट खुलासा आणि सभेच्या प्रोसिडींगची प्रत तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अर्जात ३ एप्रिल रोजी विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध झाल्यानंतर शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके यांनी आक्षेप घेतला होता. बुचके आणि सदस्य गुलाबराव पारखे यांनी हा अपील अर्ज केला आहे. अर्जाची तपासणी करून आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना नोटीस पाठवून तत्काळ खुलासा मागितला आहे. आशाताई बुचके यांनी, उद्या (दि. १५) होणाऱ्या आरोग्य, बांधकाम, कृषी पशुसंवर्धन, अर्थ आणि शिक्षण या ६ समित्यांच्या गठनाची प्रक्रिया सभापतींच्या खातेवाटपाचा अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे. खातेवाटप अवैध असेल तर त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या विषय समित्यांचे गठन होणे अयोग्य असल्याचे नमूद केले आहे. या अर्जामुळे जिल्हा परिषद प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उद्या (शनिवारी) या संदर्भात आयुक्त काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)