पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये अपघात; इंजिनचे चाक घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:07 IST2021-10-14T12:02:58+5:302021-10-14T12:07:43+5:30

पुणे रेल्वे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्ड मध्ये गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास इंजिन घसरून (accicent) अपघात झाला.

accident in the yard of Pune railway station the engine wheel slipped | पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये अपघात; इंजिनचे चाक घसरले

पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये अपघात; इंजिनचे चाक घसरले

ठळक मुद्देघटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य वेगाने सुरू

पुणे : पुणेरेल्वे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्ड मध्ये गुरुवारी सकाळी दहा च्या सुमारास इंजिन घसरून अपघात झाला. शंटिंग करणारे हे कपल इंजिन होते. यातील एका इंजिनचे चार चाक घसरले .सुदैवाने इंजिनाचा वेग कमी होता. अन्यथा हे इंजिन कोसळून रुळांचे मोठे नुकसान झाले असते. या अपघातामुळेरेल्वे वाहतूकिवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच यात कोणीही जखमी नाही. घटने नंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य वेगाने सुरू आहे.

Web Title: accident in the yard of Pune railway station the engine wheel slipped