Accident: चाकणला दोन टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार तर दोन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 16:26 IST2021-10-31T12:50:33+5:302021-10-31T16:26:46+5:30
अपघातात ठार झालेली व्यक्ती टेम्पोमध्ये प्रवाशी म्हणून बसलेली होती.

Accident: चाकणला दोन टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार तर दोन गंभीर जखमी
चाकण : चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेलगाव येथे मालवाहू टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ( Accident) एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात ठार झालेली व्यक्ती टेम्पोमध्ये प्रवाशी म्हणून बसलेली होती.
सुनील गंगाधर जोगदंड असे या भीषण अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबत प्राप्त झालेल्या माहिती नुसार चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेलगाव दरम्यानच्या हद्दीत दत्तमंदिराच्या समोर वेगवेगळ्या बाजूकडून आलेले दोन टेम्पो एकमेकांवर आदळले. धडकेत दोन्ही मालवाहू टेम्पोचा अक्षरशः चक्काचूर झाला.
टेम्पोत प्रवाशी म्हणून बसलेले जोगदंड जागीच ठार झाले. तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशिरा पर्यंत या बाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चाकण पोलीस ठाण्यात सुरु होती. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.