सासवडजवळ स्वारगेट-पंढरपूर एसटी बसला अपघात, १० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 19:29 IST2019-07-18T19:29:04+5:302019-07-18T19:29:25+5:30
सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. बसमध्ये ३९ प्रवासी होते...

सासवडजवळ स्वारगेट-पंढरपूर एसटी बसला अपघात, १० जण जखमी
जेजुरी : पंढरपूरहून स्वारगेटला जाणाऱ्या एसटी बसला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सासवडजवळ रासकर मळा येथे अपघात झाला. यात १० जण प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. बसमध्ये ३९ प्रवासी होते. चालक एस. ए. लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावरून सासवडकडे जात असताना समोरून एक एसटी बस येत होती. तिच्यापुढे एक दुचाकीस्वार चालला होता. समोरून येणाऱ्या बस चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पुलाची रुंदी कमी असल्याने ब्रेक लावला. मात्र, बसवरील ताबा सुटला आणि थेट पुलाच्या कठड्यावर चढली. मात्र जखमींना सासवड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या आठ वर्षांपासून रखडले आहे. अनेक ठिकाणी मार्ग अरुंद आहे, रस्ते दुभाजक नाहीत, मार्गाचे काम ही अनेक ठिकाणी अर्धवट सोडून देण्यात आले आहे. यामुळे वारंवार अपघात होत आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे तर जीवास मुकावे लागले आहे.