पुण्यात पोलीस व्हॅनला अपघात; निरीक्षक, चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 13:13 IST2020-04-24T13:13:08+5:302020-04-24T13:13:16+5:30

शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयासमोरील पुलावर व्हॅनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन पुलाच्या दुभाजकाला धडकली

Accident to police van in Pune; Inspector, driver injured | पुण्यात पोलीस व्हॅनला अपघात; निरीक्षक, चालक जखमी

पुण्यात पोलीस व्हॅनला अपघात; निरीक्षक, चालक जखमी

पुणे : पुणे पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकांच्या व्हॅनला भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयासमोरील पुलावर व्हॅनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन पुलाच्या दुभाजकाला धडकली. त्यात पोलीस निरीक्षक राम राजमाने आणि त्यांचा चालक हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
पोलीस निरीक्षक राम राजमाने हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक आहेत. आज सकाळी ते घरातून पोलीस ठाण्यात येत होते. त्यावेळी कृषी महाविद्यालयासमोरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटून व्हॅन दुभाजकाला धडकली. त्यातदुभाजक आणि गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही. राम राजेमाने त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.  तर चालकाच्या पायाला मार लागला असल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Accident to police van in Pune; Inspector, driver injured