कात्रज - कोंढवा रोडवर अपघात; दुचाकी चालक थोडक्यात बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 10:55 IST2023-06-27T10:54:38+5:302023-06-27T10:55:05+5:30
वारंवार कात्रज कोंढवा रोडवर अपघात होत असून यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे तर काही गंभीर जखमी देखील झाले आहेत

कात्रज - कोंढवा रोडवर अपघात; दुचाकी चालक थोडक्यात बचावला
कात्रज: पावसाळा सुरू झाल्याने पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. तर काही ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. तसेच रस्ते देखील निसरडे झाले आहेत.
कात्रजकोंढवा रोडवर सकाळपासूनच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्याचबरोबर या रस्त्यावर अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. नोकरीवर बाहेर पडणारा नोकर वर्ग तसेच शाळकरी मुले सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात. मंगळवारी सकाळी दहाच्या सोमवार शिवशंभू नगर गल्ली नंबर एकच्या समोर दुचाकी चालक व डंपर यामध्ये अपघात झाला. घटनेत दुचाकी स्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून सुदैवाने दुचाकी चालकाचा जीव थोडक्यात वाचला आहे. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त ला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
वारंवार कात्रज कोंढवा रोडवर अपघात होत असून यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. तर अनेक लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत. त्यामुळे यावर प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.