पुणे-सोलापूर महामार्गांवर मिनी बस, कंटेनर व टेम्पोचा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 11:42 IST2022-11-08T11:41:04+5:302022-11-08T11:42:41+5:30

यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी गर्दी केली होती...

Accident of mini bus, container and tempo on Pune-Solapur highway | पुणे-सोलापूर महामार्गांवर मिनी बस, कंटेनर व टेम्पोचा अपघात

पुणे-सोलापूर महामार्गांवर मिनी बस, कंटेनर व टेम्पोचा अपघात

लोणी काळभोर :पुणे-सोलापूर महामार्गावर एमआयटी कॉलेजच्या चौकात मिनी बस, कंटेनर व टेम्पो यांच्यात सोमवारी (दि. ७) सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मिनी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर एमआयटी चौकात कंटेनर हा पुणे बाजूकडून सोलापूरच्या बाजूला अचानक वळण घेत असताना सोलापूरच्या बाजूला जाणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळला. त्यातच कंटेनरच्या पाठीमागे असलेली मिनी बस ही कंटेनर पाठीमागून जोरात धडकली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी गर्दी केली होती.

दरम्यान, काही वेळ सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांची एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एमआयटी कॉलेजच्या चौकात कायम वर्दळ असते. या ठिकाणी सिग्नल बसवले असून ते अजून सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग खूप असतो. अशातच एमआयटी कॉलेजच्या बाजूने येणारे कंटेनर त्या ठिकाणी असलेल्या चढामुळे पुणे-सोलापूर महामार्गांवर मधोमध येऊन थांबतात त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण होत असते. यासाठी काहीतरी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.

Web Title: Accident of mini bus, container and tempo on Pune-Solapur highway