Accident: पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत 5 जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 08:36 IST2022-08-17T08:26:42+5:302022-08-17T08:36:17+5:30

चुकीच्या दिशेने प्रवास करत असलेला ट्रक अचानक रोडच्या मधोमध आल्याने कारची आणि ट्रकची जोरदार धडक झाली.

Accident: Four wheeler car and truck accident on Pune-Ahmadnagar highway, 5 people died on the spot | Accident: पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत 5 जण जागीच ठार

Accident: पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत 5 जण जागीच ठार

पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांत अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचेही अपघाती निधन झाले. तर, बीड जिल्ह्यातच आणखी एका अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताच्या घटना थांबताना दिसत नाहीत. बुधवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये, 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

चुकीच्या दिशेने प्रवास करत असलेला ट्रक अचानक रोडच्या मधोमध आल्याने कारची आणि ट्रकची जोरदार धडक झाली. त्यामध्ये, कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातामध्ये संजय भाऊसाहेब म्हस्के (वय 53), राम भाऊसाहेब म्हस्के (वय 45), राम राजू म्हस्के (वय 7), हर्षदा राम म्हस्के (वय 4 वर्षे), विशाल संजय म्हस्के (वय 16) वर्ष यांचा मृत्यू झाला असून साधना राम म्हस्के या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

रांजणगाव एमआयडीसीतील LG कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. या कारमधील सर्व प्रवासी पनवेलला जात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. क्रेनच्या सहाय्याने वाहनं हटविण्यात आली आहेत. 
 

Web Title: Accident: Four wheeler car and truck accident on Pune-Ahmadnagar highway, 5 people died on the spot