शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पुणे-सोलापूर महामार्गावरील पोंधवडीत चालकाचा ताबा सुटल्याने अपघात; पाच गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 4:57 PM

पुणे-सोलापूर महामार्गावर पोंधवडी गावच्या हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसुदैवाने गाडीतील जीवरक्षक फुगे खोलले गेल्याने टळली जीवितहानी वेगवान वाहने आणि धोकादायक क्रॉसिंगमुळे अपघाताचे वाढले प्रमाण

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर पोंधवडी गावच्या हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. वेगवान वाहने आणि धोकादायक क्रॉसिंगमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून महामार्ग पोलिसांनी या विषयीची उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, लातूर येथील डॉक्टर कुटुंबीय सोलापूर मार्गे पुण्याला जात असताना पोंधवडी गावच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने कार नं. एम. एच. २४ ए एस १९२८ पलटी खात रस्ता सोडून रस्त्याच्या कडेला घसरली. यात कारमधील डॉ. विक्रम कुंडुबले (वय ३५), डॉ. प्रियांका कुंडुबले (वय ३०),  शोभा सिद्धेश्वर पाटील (वय ५६) वरूण पाटील (वय ३२), सिद्धेश्वर पाटील (वय ६३) हे गंभीर जखमी झाले. कारच्या पलटी होताना सुदैवाने गाडीतील जीवरक्षक फुगे खोलले गेल्याने जीवितहानी टळली. अपघातातील जखमींना भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात