लग्नसमारंभावरून घरी येताना शिरवळ येथे अपघात; पुण्यातील उद्योजकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 13:54 IST2023-03-19T13:54:01+5:302023-03-19T13:54:54+5:30
दुचाकी महामार्गालगत थांबवून सुरक्षित ठिकाणी जाताना सर्व्हिस रस्त्यावरून निघालेल्या जीपने उद्योजकाला जोरदार धडक दिली

लग्नसमारंभावरून घरी येताना शिरवळ येथे अपघात; पुण्यातील उद्योजकाचा जागीच मृत्यू
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ हद्दीतील एका वॉशिंग सेंटरसमोर जीपची धडक बसल्याने पुणे येथील उद्योजकाचा जागीच मृत्यू झाला आहे. नंदकिशोर रावसाहेब आवारी (वय ५५, रा. चंदननगर, खराडी, पुणे), असे जागीच मृत्यू झालेल्या उद्योजकांचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, चंदननगर, पुणे येथील उद्योजक नंदकिशोर आवारी हे सातारा जिल्ह्यातील भिलार याठिकाणी लग्न समारंभाकरिता पुण्याहून दुचाकी वरून आले होते. लग्नसमारंभानंतर आवारी हे परत पुणे बाजूकडे निघाले होते. शिरवळ याठिकाणी आले असता पाऊस लागल्याने ते दुचाकी महामार्गालगत थांबवून सेवा रस्त्यावरून सुरक्षित ठिकाणी जात असताना सर्व्हिस रस्त्यावरून निघालेली जीपने जोरदार धडक दिली. धडकेनंतर गंभीर जखमी झालेल्या आवारी यांना नागरिकांनी व जीपचालकाने शिरवळ येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यावेळी आवारी यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.