Accident: पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, १४ जण जखमी, मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 22:07 IST2021-10-22T21:58:48+5:302021-10-22T22:07:41+5:30
अपघातांची मालिका सुरूच; वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांचा संताप

Accident: पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, १४ जण जखमी, मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता
धायरी : मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरातील काल गुरुवारी सेल्फी पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान आज शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी मोठा अपघात झाला असून एका गॅस घेऊन निघालेल्या टँकरने १३ सिटर ट्रॅव्हलरला जोराची धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी होऊन सेवा रस्त्यावर पडली. यावेळी सेल्फी गार्डन मध्ये बसलेले काही नागरिकही जखमी झाल्याचे समजत आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले असल्याचे समजते आहे.