शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हडपसर परिसरातील घटना

By नितीश गोवंडे | Published: March 21, 2024 3:49 PM

मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला

पुणे: ओळखीचा गैरफायदा घेऊन एका सराईत गुन्हेगाराने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यातून ती गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत हडपसर परिसरातील शिंदे वस्ती येथे घडला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून तो सध्या अमरावती जेलमध्ये आहे.

याप्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने बुधवारी (दि. २०) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून तुषार कैलास काकडे  (२०, रा. हडपसर) याच्यावर बलात्कारासह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी तुषार काकडे हा दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह कोयता, चाकू या सारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. तत्कालीन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपी तुषार काकडे याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत त्याला एक वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कविराज पाटील करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाMolestationविनयभंग