शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डातील फळ विभागातून वर्षभरात सुमारे दीड लाख दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST

पुणे : मार्केट यार्डातील फळ विभागात वर्षभरात दंडात्मक कारवाई करून १ लाख ४८ हजार ४४४ रुपयांचा दंड वसूल केला ...

पुणे : मार्केट यार्डातील फळ विभागात वर्षभरात दंडात्मक कारवाई करून १ लाख ४८ हजार ४४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे. गाळ्यापासून १५ फुटांच्या पुढे शेतीमालाची विक्री करणे, अनधिकृतपणे विक्री करणारे विक्रेते, रहदारीस अडथळा करणारी वाहने आणि मास्क न वापरणाऱ्यांवर ही कारवाई केली आहे. फळ विभागाचे गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.

१ नोव्हेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ही कारवाई केली आहे. बाजाराला शिस्त लागावी, यासाठी बाजार समिती प्रशासनच्या वतीने ही कारवाई करण्यात येते. गाळ्यापासून १५ फुटांच्या बाहेर फळे विक्री करण्यास विक्रेत्यांना मज्जाव केला आहे. तरीही काही विक्रेते १५ फुटांच्या बाहेर जाऊन विक्री करतात. त्यांच्यावर आणि वाहतुकीस अडथळा येईल अशा ठिकाणी वाहने लावण्यात येतात. त्या वाहनांच्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. तर काही विक्रेते अनधिकृतपणे विक्री करतात. त्याच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येते. सध्या कोरोना संसर्गाची साथ सुरू आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे आवश्‍यक आहे. पोलीस ठिकठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिक, वाहनचालंकावर कारवाई करत आहेत. याच धर्तीवर बाजार आवारात बाजार समिती प्रशासनाच्या वतीनेही विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. फळ विभागातही अशी कारवाई करण्यात येत असल्याचे कोंडे यांनी सांगितले.