गुढ वाढलं! पत्नी आणि मुलाचा खून करणाऱ्या पतीची धक्कादायक बाब समोर, नदीत आढळला पतीचाच मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 10:41 AM2021-06-18T10:41:33+5:302021-06-18T11:15:03+5:30

धानोरी परिसरात वास्तव्यास असलेल्या आबिद शेख याने मायलेकराचा निर्घुण खून करुन त्यांचे मृतदेह सासवड व कात्रज घाटात वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते.

Abid Sheikh's body found in river near Khanapur | गुढ वाढलं! पत्नी आणि मुलाचा खून करणाऱ्या पतीची धक्कादायक बाब समोर, नदीत आढळला पतीचाच मृतदेह

गुढ वाढलं! पत्नी आणि मुलाचा खून करणाऱ्या पतीची धक्कादायक बाब समोर, नदीत आढळला पतीचाच मृतदेह

Next
ठळक मुद्दे दोघांचा खुन करुन स्वत: पसार झाल्याचे आतापर्यंतच्या तपासावरुन निष्पन्न होत होते. त्यामुळे आबिद शेख याचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत होता.

पुणे: पत्नी आलिया आणि मुलगा आयान यांचा खून केल्यानंतर बेपत्ता झालेल्या आबिद अब्दुल शेख (वय ३८) याचा आज सकाळी खानापूर येथे नदीच्या पाण्यात मृतदेह आढळून आला आहे. खडकवासला धरणाच्या पुढे खानापूर येथे एक मृतदेह आढळून आला. तपास करता गेले काही दिवस पुणे व ग्रामीण पोलीस ज्यांचा शोध घेत होते. त्या आबिद शेख यांचा तो मृतदेह असल्याचे लक्षात आले. हवेली पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

धानोरी परिसरात वास्तव्यास असलेल्या आबिद शेख याने मायलेकराचा निर्घुण खून करुन त्यांचे मृतदेह सासवड व कात्रज घाटात वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. दुहेरी खुन प्रकरणातील पतीवर पोलिसांचा सर्व तपास केंद्रीत झाला करण्यात आला होता. त्यानेच दोघांचा खुन करुन स्वत: पसार झाल्याचे आतापर्यंतच्या तपासावरुन निष्पन्न होत होते. त्यामुळे आबिद शेख याचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत होता. 

सातारा रोडवर भाड्याने घेतलेली कार पार्क करुन रस्ता ओलांडून जात असताना तेथील सीसीटीव्हीमध्ये अबिद शेख कैद झाला होता.  तेथून तो कोठे निघून गेला, याचा शोध सुरु होता. याप्रकरणी सासवड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आयान शेख (वय ६) आणि आलिया शेख (वय ३५) असे खुन झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. मध्य प्रदेशाहून बुधवारी त्यांचे नातेवाईक आले आहेत. त्यांनी मायलेकरांवर काल अंत्यसंस्कार केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Abid Sheikh's body found in river near Khanapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app