शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

गुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 3:44 PM

मराठी रंगभूमीवरील आधुनिकोत्तर कालखंडातील महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबर रोजी गणेश वंदना, पालखीनृत्य, कोळीनृत्य, शेतकरीनृत्य आणि नमन या लोककलांचे सादरीकरण होणार नियोजित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत होणार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदतर्फे विभागीय मराठीसाहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबर रोजी गुहागरला होणार आहे. मराठी रंगभूमीवरील आधुनिकोत्तर कालखंडातील महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उदघाटन कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. तीन दिवसीय साहित्य संमेलनाची सुरुवात १४ डिसेंबरला सकाळी ग्रंथदिंडीने होणार आहे. सायंकाळी स्थानिकांचे कविसंमेलन होणार असून ‘कोकणी लोककला’ या सांस्कृतिक कार्यक्रमात गणेश वंदना, मंगळागौर, पालखीनृत्य, कोळीनृत्य, शेतकरीनृत्य आणि नमन या लोककलांचे सादरीकरण होणार आहे. १५ डिसेंबरला सकाळी ‘लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला’, ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ या विषयावरील चर्चांचा समावेश आहे. त्यानंतर कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे घेणार आहेत. रात्री प्रसिद्ध निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. पुल, गदिमा आणि बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘काव्य नव्हे, हा अमृतसंचय’ हा विशेष कार्यक्रम चैत्राली अभ्यंकर आणि सहकारी सादर करणार आहेत. १६ डिसेंबर रोजी सकाळी ‘आमची बोली, आमची भाषा’ या विषयावरील परिसंवाद पार पडेल.  त्यानंतर सकाळी नियोजित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. दुपारी हास्य कवी संमेलन, तर सायंकाळी ‘कारगील विजय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ------------ संमेलनाची वैशिष्टये१. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने निघणार ग्रंथदिंडी२. गणेशवंदना, मंगळागौर, पालखीनृत्य,कोळीनृत्य, शेतकरीनृत्य, नमन या कोकणी लोककलांचे होणार सादरीकरण३. ‘रत्नाकर’ या स्मरणिकेचे प्रकाशन 

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठीliteratureसाहित्य