अभय भुतडा फाऊंडेशनकडून शिवसृष्टीला आणखी 75 लाख रुपयांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:31 IST2025-08-13T18:30:38+5:302025-08-13T18:31:43+5:30
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी सीए अभय भुतडा यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

अभय भुतडा फाऊंडेशनकडून शिवसृष्टीला आणखी 75 लाख रुपयांची मदत
पुणे - शिवसृष्टी थीम पार्कला पूर्वी दिलेल्या 50 लाख रुपयांच्या देणगीमुळे पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्यानंतर, अभय भुतडा फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष अभय भुतडा यांनी शिवसृष्टीला 75 लाख रुपयांची अतिरिक्त मदत दिली आहे.
अभय भुतडा फाऊंडेशनने थीम पार्कला आणखी 75 लाख रुपयांची मदत केली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला फाऊंडेशनने 50 लाख रुपये दिल्यामुळे 15 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान तिकिटाचे दर फक्त 50 रुपये ठेवता आले. या काळात दीड लाखांहून अधिक लोकांनी या सवलतीचा लाभ घेतला. जनतेच्या मोठ्या मागणीनुसार आणि फाऊंडेशनकडून मिळालेल्या या नव्या 75 लाख रुपयांच्या मदतीमुळे आता सवलतीचे तिकिट दर 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत.
सीए अभय भुताडा हे यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक आहेत. त्यांच्या फाऊंडेशनचा पाठिंबा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, तो समाजात खऱ्या अर्थाने बदल घडवणाऱ्या उपक्रमांमध्येही सक्रिय असतो. शिवसृष्टीसारख्या समाजाच्या सहभागातून चालणाऱ्या आणि वारसा जपणाऱ्या प्रकल्पांशी हातमिळवणी करून, फाऊंडेशन सांस्कृतिक इतिहास जपण्यासाठी आणि तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करते. त्यांच्या योगदानाचा उद्देश समुदायांना सक्षम बनवणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक वारशाचा अभिमान वाढवणे हा आहे.
शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी सीए अभय भुतडा यांचा पाठिंबा
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी सीए अभय भुतडा यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “बँकिंग, फायनान्स आणि विमा क्षेत्रातील ख्यातनाम उद्योजक अभय भुतडा यांनी यापूर्वी त्यांच्या फाऊंडेशनमार्फत शिवसृष्टी प्रकल्पासाठी 50 लाख रुपये दिले होते. या निधीच्या मदतीने आम्ही 15 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान तिकिटांवर सवलत दिली, ज्यामुळे दीड लाखांहून अधिक लोकांना शिवाजी महाराजांचा काळ अनुभवता आला. जनतेच्या मागणीनुसार आणि अभय भुतडा फाऊंडेशनकडून मिळालेल्या आणखी 75 लाख रुपयांच्या मदतीमुळे आम्ही ही सवलत आता 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अभय भुतडा यांच्या मदतीबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत आणि या देणगीच्या माध्यमातून शिवचरित्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
सीए अभय भुतडा हे बँकिंग, फायनान्स आणि विमा क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे आदरणीय उद्योजक व समाजसेवक आहेत. त्यांनी या थीम पार्कला पाठिंबा दिला कारण त्याचा उद्देश शिवाजी महाराजांचा इतिहास कमी खर्चात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
अभय भुतडा फाउंडेशन आणि त्याचा प्रभाव
2023 साली स्थापन झालेले अभय भुतडा फाऊंडेशन हे समाजातील वंचित घटकांच्या उन्नती, शिक्षण आणि प्रगतीसाठी काम करते. अल्पकालीन मदतीऐवजी दीर्घकालीन परिणामावर भर देत, प्रत्येक प्रकल्प टिकाऊ आणि मोजता येण्यासारखे परिणाम देईल याची फाऊंडेशन काळजी घेते. सीए अभय भुतडा यांच्या संपूर्ण निधीतून चालणारे हे फाऊंडेशन बाहेरील देणग्या न घेता शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देते. अल्पावधीतच, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श केला असून, केवळ मदतच नाही तर प्रेरणा, आशा आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा मार्गही अनेकांना मिळवून दिला आहे.