Pune | सारसबागेत आढळली बेवारस बॅग; बाॅम्बच्या अफवेने घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 09:37 AM2023-01-18T09:37:01+5:302023-01-18T09:38:22+5:30

बाॅम्ब शाेधक व नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बॅगेची तपासणी...

Abandoned bag found in Sarasbagh; Panic over bomb rumours pune police | Pune | सारसबागेत आढळली बेवारस बॅग; बाॅम्बच्या अफवेने घबराट

Pune | सारसबागेत आढळली बेवारस बॅग; बाॅम्बच्या अफवेने घबराट

googlenewsNext

पुणे : सारसबागेत बेवारस बॅग सापडल्यानंतर बुधवारी सायंकाळी घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाॅम्ब शाेधक व नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बॅगेची तपासणी केली. तेव्हा पिशवीत संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

स्वारगेट पोलिस ठाण्यातील पोलिस पथक घटनास्थळी दाखल हाेत सारसबागेचा परिसर त्वरित मोकळा केला. बाॅम्ब शोधक व नाशक पथकही घटनास्थळी दाखल झाले. बॅगेची पाहणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. जी-२० परिषदेसाठी शहरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सारसबागेत बेवारस बॅग सापडल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली.

Web Title: Abandoned bag found in Sarasbagh; Panic over bomb rumours pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.