धमकी देऊन तरुणीवर बोपदेव घाटात बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 13:12 IST2023-09-23T13:10:20+5:302023-09-23T13:12:25+5:30

बाेपदेव घाटात घेऊन जात तरुणीवर बलात्कार...

A young woman was raped at Bopdev Ghat by threats, a shocking incident in Pune | धमकी देऊन तरुणीवर बोपदेव घाटात बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

धमकी देऊन तरुणीवर बोपदेव घाटात बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : काेंढवा परिसरातील बाेपदेव घाटात घेऊन जात तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार बजरंग जयवंत रुमाले (वय २१) आणि त्याच्या मित्राविरुद्ध काेंढवा पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.

पीडित तरुणीचे आजोबा नांदेड जिल्ह्यात राहायला होते. आजोबांचे निधन झाल्याने ती मे २०२३ मध्ये नांदेड येथे गेली होती. तेथे आरोपी रुमालेशी तिची ओळख झाली. त्यानंतर तरुणी पुण्यात परतली. रुमाले आणि त्याचा मित्र पुण्यात आले. तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीला धमकावून रुमालेने तिला बोपदेव घाटात नेले. तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. पाेलिसांकडून आराेपींचा शाेध घेतला जात आहे.

Web Title: A young woman was raped at Bopdev Ghat by threats, a shocking incident in Pune