शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यात दुचाकी कोसळून युवती ठार तर दोन गंभीर जखमी; संतप्त नागरिकांकडून रस्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 20:10 IST

नीरा : पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा लोणंद परिसरात खड्ड्यात मोटारसायकल कोसळून युवतीचा जागीच मृत्यू  झाला आहे. तर इतर ...

नीरा : पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा लोणंद परिसरात खड्ड्यात मोटारसायकल कोसळून युवतीचा जागीच मृत्यू  झाला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. माणिक सोना पेट्रोल पंपासमोर महामार्गावरील खड्ड्यामुळे यापूर्वी अनेक अपघात झाले आहे.  या अपघातातमृत्यू झालेल्या युवतीचे नाव अंकीता धायगुडे (वय २०) आहे.    मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. ०६) रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माणिक सोना पेट्रोल पम्प जवळ बाळूपाटलाचीवाडी येथील तिघेजण मोटार सायकल वरून जात असतांना त्यांनी मोटारसायकल खड्ड्यात कोसळली. यावेळी अंकिता अनिल धायगुडेचा जागीच मृत्यू झाला. तर चालक विशाल दौलत धायगुडे (वय २७), सानिका विलास धायगुडे ( वय १८ ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.पालखी मार्गावरील लोणंद ते नीरा दरम्यान रस्त्यात लोणंद नागरपंचायतच्या पाणी लाईनचे दुरुस्तीचे काम चालू होते. सदर ठिकाणी ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारचे बॅरीगेटस् किंवा अडथळा उभारला नसल्याने या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे रस्त्यावरच असणारा हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. यामुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.या अपघातानंतर बाळूपाटलाचीवाडी येथील ग्रामस्थांनी लोणंद येथील राजमाता अहिल्यादेवी चौक येथे सुमारे अर्धा तास अडवून धरत दोषींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळेस लोणंद पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सुशील भोसले यांनी रास्ता रोको करणाऱ्यांची समजूत काढत त्यांना लोणंद पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम ऊशीरा पर्यंत चालू होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू