लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणीवर अत्याचार
By नितीश गोवंडे | Updated: January 10, 2024 15:07 IST2024-01-10T15:06:19+5:302024-01-10T15:07:10+5:30
मागील चार वर्षात वारंवार पीडितेच्या घरी, खेड शिवापूर, बोपदेव घाटातील हॉटेलमध्ये हा प्रकार घडला

लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणीवर अत्याचार
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ३४ वर्षीय युवकावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील चार वर्षात वारंवार पीडितेच्या घरी, खेड शिवापूर, बोपदेव घाटातील हॉटेलमध्ये घडला आहे.
याप्रकरणी नऱ्हे येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणीने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. ९) फिर्याद दिली आहे. यावरून नऱ्हे गावात राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०१९ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित तरुणीच्या आत्याचा मुलगा आहे. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या घरी जाऊन जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवले. शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ आणि तरुणीचे न्यूड फोटो काढले. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने खेड शिवापूर आणि बोपदेव घाटातील हॉटेलमध्ये नेऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बुनगे करत आहेत.