धावत्या रेल्वेखाली तरुणीसह तरुणाने उडी मारून संपवलं जीवन; पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 16:09 IST2024-10-22T16:09:13+5:302024-10-22T16:09:34+5:30
प्राथमिक चौकशीत दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केला

धावत्या रेल्वेखाली तरुणीसह तरुणाने उडी मारून संपवलं जीवन; पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना
पुणे: पुणेरेल्वे स्टेशनवर तरुणीसह तरुणाने रेल्वेगाडी समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे समजू शकली नाही.
मृत्युमुखी पडलेल्या तरुणीसह दोघांचे मृतदेह ससून रुग्णलयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. प्राथमिक चौकशीत दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केला. पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक परिसरातून दोघे जण मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी दोघांनी अचानक धावत्या रेल्वेखाली उडी मारली, अशी माहिती पोलिसांनी दिली.