Pune: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणावर कोयत्याने वार; कात्रज भागातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 08:45 IST2023-06-05T08:44:39+5:302023-06-05T08:45:54+5:30

तीन चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

A young man was stabbed with a knife on the pretext of asking for an address; Incidents in Katraj area | Pune: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणावर कोयत्याने वार; कात्रज भागातील घटना

Pune: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणावर कोयत्याने वार; कात्रज भागातील घटना

धनकवडी (पुणे) : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणावर कोयत्याने वार करून चोरट्यांनी साडेचार हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना कात्रज भागात घडली. यात सचिन वसंत तळवार (वय ३१, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, कोल्हापूर) जखमी झाली आहेत.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन तळवार पुण्यात कामानिमित्त आले होते. ते कात्रज भागातून निघाले होते. त्यावेळी तीन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि पत्ता विचारण्याचा बहाणा केला.

चोरट्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखविला. त्यांच्याकडील साडेचार हजार रुपयांची रोकड हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. सचिन यांनी चोरट्यांना विरोध केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्यांच्याकडील साडे चार हजार रुपयांची रोकड हिसकावून चोरटे पसार झाले.

जखमी झालेले सचिन यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा तपासासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडे सोपविला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ करत आहेत.

Web Title: A young man was stabbed with a knife on the pretext of asking for an address; Incidents in Katraj area