शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
2
'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
3
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
4
“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
5
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
6
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
7
VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
9
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
10
एचआयव्ही पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला दिलासा; नोकरी कायम करण्याचे हायकाेर्टाने दिले निर्देश
11
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
12
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
14
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
15
जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत
16
Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
17
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
18
Nashik Municipal Election 2026: आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार
19
वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?
20
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
Daily Top 2Weekly Top 5

डेमो रेल्वेतून उतरताना युवकाचा भीषण अपघात; दोन्ही पाय चिरडले, मदतीला रेल्वे यंत्रणा अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:07 IST

विशेष म्हणजे, नीरा रेल्वे स्टेशनमधील पोलीस मदत केंद्राला कुलूप लागलेले असल्याचेही समोर आले असून ‘सुरक्षा कुणासाठी?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नीरा : रेल्वेअपघातानंतर जखमीला वाचवणे हे प्रशासनाचे कर्तव्य असताना नीरा रेल्वे स्टेशनवर मात्र माणुसकीच थांबली असल्याचे धक्कादायक चित्र सोमवारी (दि.२९) रात्री पाहायला मिळाले. पुणे–सातारा डेमो रेल्वेतून उतरत असताना एका १८ वर्षीय युवकाचा भीषण अपघात झाला. मात्र, या दुर्घटनेनंतर रेल्वे पोलिस, आरपीएफ आणि स्टेशन कर्मचाऱ्यांनी मदतीचा साधा हातही पुढे न केल्याचा गंभीर आरोप होत आहे. सोमवारी संध्याकाळी नीरा रेल्वे स्टेशनमध्ये पुणे–सातारा डेमो रेल्वे थांबली असताना उतरताना आदित्य साहेबराव होळकर (वय १८), रा. सोमेश्वरनगर, ता. बारामती हा युवक रेल्वेखाली गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भीषण अपघातात त्याचे दोन्ही पाय चिरडले गेले असून तो गंभीर जखमी झाला आहे. 

अपघातानंतर काही क्षणातच स्टेशन परिसरात गोंधळ उडाला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेले रेल्वे पोलिस, आरपीएफ व नीरा रेल्वे स्टाफ यांनी कोणतीही तत्काळ मदत न केल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, नीरा रेल्वे स्टेशनमधील पोलीस मदत केंद्राला कुलूप लागलेले असल्याचेही समोर आले असून ‘सुरक्षा कुणासाठी?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.  या घटनेनंतर स्थानिक युवकांनी जखमी आदित्य होळकर याला मदतीसाठी धाव घेतली. प्रहार संघटनेच्या रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने उपचारासाठी प्रथम लोणंद, त्यानंतर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. सध्या पुढील उपचारासाठी पुण्यातील संचेती रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, इतका गंभीर अपघात घडूनही रेल्वे प्रशासनाची उदासीनता आणि निष्क्रियता संतापजनक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा अपघाताच्या वेळीच गायब होत असेल, तर तिचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेची वरिष्ठ कार्यालयांनी तातडीने गंभीर दखल घ्यावी, दोषी अधिकाऱ्यांवर ठोस आणि कडक कारवाई करावी, तसेच नीरा रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व आपत्कालीन मदत व्यवस्थेचा आढावा घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Youth Severely Injured in Train Accident; Railway Assistance Fails

Web Summary : A youth lost both legs in a train accident at Nira station. Railway staff allegedly failed to provide immediate assistance. Locals rushed him to the hospital, highlighting railway apathy and demanding accountability for negligence and improved safety measures.
टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीSocialसामाजिकAccidentअपघातhospitalहॉस्पिटल