महिलेच्या त्रासामुळे तरुणाची कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 15:09 IST2022-07-27T15:09:31+5:302022-07-27T15:09:44+5:30

महिलेने जीवे मारण्याची धमकी दिली होती

A young man committed suicide by jumping into the canal due to the trouble of the woman | महिलेच्या त्रासामुळे तरुणाची कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या

महिलेच्या त्रासामुळे तरुणाची कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या

पुणे : भांडणे झाल्याच्या कारणातून महिलेने दिलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केली. नयन नरेंद्र मोरे (वय २०, रा. भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह सोमवारी वैदवाडी कॅनॉल हडपसर येथे आढळून आला.

याबाबत नूतन बाहुले याने फिर्याद दिली. त्यानुसार खडक पोलिसांनी जेबा सय्यद (वय ३०, रा. भवानीपेठ) या महिलेला अटक करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, आत्महत्या केलेला तरुण नयन आणि आरोपी महिला जेबा हे शेजारी राहतात. व्हिडिओ काढल्याच्या संशयावरुन जेबा हिने त्याला जाब विचारला व जीवे मारण्याची धमकी दिली. दोन दिवस हा प्रकार सुरू होता. त्यानंतर शनिवारी सकाळी (दि. २३) नयन घरातून निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या घरच्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. हडपसर येथील वैदवाडी कॅनॉल येथे सोमवारी त्याचा मृतदेह मिळून आला. त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत जेबा हिच्याविरुद्ध तक्रार दिली होती. पोलीस उपनिरीक्षक डोंगळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A young man committed suicide by jumping into the canal due to the trouble of the woman