घराला लागलेल्या आगीत अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका
By नितीश गोवंडे | Updated: October 29, 2023 17:45 IST2023-10-29T17:44:47+5:302023-10-29T17:45:38+5:30
आग कशामळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नसून आगीमधे सदनिकेचे मात्र मोठे नुकसान

घराला लागलेल्या आगीत अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका
पुणे : धनकवडी परिसरातील एका घराला लाग लागली. यामध्ये एक महिला अडकून प़डली. मात्र वेळीच अग्निशमन पथकाने धाव घेत महिलेची सुखरूप सुटका केली. ही घटना शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास श्रीधरनगर, हिल पॉईंट सोसायटी येथे घडली.
अग्निशमन दलाला घटनेची माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावर एका सदनिकेत आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. त्याचवेळी तेथेच एका खोलीत एक महिला धुरामुळे अडकली असल्याने जवानांनी तातडीने बी. ए. सेट परिधान करत खोलीत प्रवेश करुन सदर महिलेला सुखरूप बाहेर आणले. अन्य जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करत सुमारे पंधरा मिनिटात संपूर्ण आग पुर्ण विझवली. आग कशामळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नसून आगीमधे सदनिकेचे मात्र मोठे नुकसान झाले. सदनिकेतील सर्व गृहपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
ही कामगिरीत अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव तसेच वाहनचालक विशाल बोबडे, ऋषी बिबवे व तांडेल वसंत भिलारे, संजय जाधव आणि जवान किरण पाटील, महेश गारगोटे, अजित लांडगे, निरंजन गायकवाड, संकेत शेलार आणि विनय निकम यांनी केली.