नीरा येथे शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 15:09 IST2024-01-16T15:08:45+5:302024-01-16T15:09:43+5:30
अल्पवयीन मुलीवर असे लैंगिक अत्याचार करून शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासली असल्याचे म्हणत पालकांनी तीव्र नाराजी

नीरा येथे शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका शिक्षकाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या विरोधात त्याच्याकडेच शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तर, त्या खासगी शिकवणीच्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका अल्पवयीन मुलीवर असे लैंगिक अत्याचार करून शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासली असल्याचे म्हणत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार नीरा (ता.पुरंदर) वार्ड नंबर एक मध्ये ज्ञानदिप कोचिंग क्लासेस मध्ये शिकवण्याचे काम करणाऱ्या सुनिल चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलगी ही त्याच्या खासगी शिकवणीत शिक्षणासाठी जात होती. त्याने प्रथम मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. दि.१ मे २०२३ रोजी दुपारी एका वाजल्यानंतर क्लासच्या आतील खोलीत आरोपीने, तु मला आवडतेस, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, आपण लग्न करू असे म्हणून जवळ ओढुन घेवुन विनयभंग केला. त्यांनतर साधारण ८ दिवसांनी क्लास संपल्यावर साधारण दुपारी १ नंतर आरोपी सुनिल चव्हाणने तिला कोचिंग क्लासेसच्या सर्व मुली निघुन गेल्यानंतर थांबवुन घेतले. व तीला शिकवण्याचे रूम सोडुन दुसरे रूममध्ये तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. मुलीने विरोध केल्यावर काही एक न ऐकता जबरदस्तीने शारीरीक संबध ठेवले. त्यानंतरही तीला नापास करण्याची धमकी देउन शारीरीक संबध ठेवले.
याबाबतचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे करीत आहेत.