Video: पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; एकमेकांच्या अंगावर दारूच्या बाटल्या फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 13:13 IST2024-03-31T12:57:11+5:302024-03-31T13:13:33+5:30

घटनेनंतर पुण्यातील छोट्या मोठ्या कारणावरून होणाऱ्या हाणामारीच्या घटना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसू लागले

A storm raged in a local liquor store in Pune They also broke liquor bottles on each other | Video: पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; एकमेकांच्या अंगावर दारूच्या बाटल्या फोडल्या

Video: पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; एकमेकांच्या अंगावर दारूच्या बाटल्या फोडल्या

किरण शिंदे 

पुणे : पुण्यातील एका देशी दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतोय. या दुकानात तुफान राडा झालाय. तुफान हाणामारी झालीय. दारूच्या दुकानात बसलेल्या चार व्यक्ती आपापसात भिडल्या. हाणामारी झालीय. इतकच नाही तर एकमेकांवर दारूच्या बाटल्याही फोडल्यात. हा संपूर्ण प्रकार लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोलीत घडला आहे. 

व्हायरल सीसीटीव्हीमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती देशी दारूच्या दुकानात येतोय. दुकानात प्रवेश करताच काही व्यक्ती बसलेल्या ठिकाणी जातोय. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक चकमक होताना दिसते. आणि त्यानंतर मात्र ही व्यक्ती मारहाण करत सुटतो. त्यानंतर टेबलवर बसलेले तिघेजण या व्यक्तीच्या अंगावर धावून येताना दिसतात. त्यांच्यात तुफान राडा सुरू होतोय. मग हे तिघेही या एका व्यक्तीला मारहाण करताना दिसतात. मात्र ते तिघे असताना सुद्धा हा एकटा व्यक्ती माघार घेत नाही. पुन्हा पुन्हा त्यांच्या अंगावर धावून जातोय. त्यांना मारहाण करताना दिसतोय. इतकच नाही तर जवळच असणारं दारूच्या रिकाम्या बाटल्याचं क्रेट उचलून तिघांच्या अंगावर फेकतोय. बराच वेळ या भांडणाचा थरार सुरू होता.

खरंतर दरम्यानच्या काळात या दुकानात अनेक जण येतात जातात. मात्र कुणीही या भांडणात पडताना दिसत नाही. भांडण सोडवण्याची हिंमत कोणीही करताना दिसत नाही. थोड्या वेळानंतर हे सर्वजण शांत होतात. भांडण करणारी व्यक्ती कानाला फोन लावते आणि अचानक निघून जाते. मात्र दुकानात झालेल्या या राड्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. मात्र या घटनेनंतर पुण्यातील छोट्या मोठ्या घटनेवरून होणाऱ्या हाणामारीच्या घटना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसू लागले आहे. 

Web Title: A storm raged in a local liquor store in Pune They also broke liquor bottles on each other