शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण; पाटील - मारणेच्या भेटीनंतर रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 17:00 IST

गुंडांना राजाश्रय देण्याच्या भाजपच्या कृत्यामुळं दहशतीखाली असलेली सामान्य जनताच आपल्याला योग्य वेळी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही

पुणे: मंगळवारी गोकुळाष्टमी पार पडली. यांनिमित्ताने राज्यभरात दहीहंडी फुटल्या तशाच त्या पुण्यातही फुटल्या. भाजपचे नेते आणि सध्या कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातही दहीहंडी होती. आणि यातील एक दहीहंडी गुंड गजानन मारणेची होती. दहीहंडीला हजेरी चक्क चंद्रकांत पाटलांनी हजेरी लावली होत. यावेळी त्यांनी या गजानन मारणेच्या हस्ते सत्कार स्वीकारला. फोटोसाठी छान अशी पोजही दिली. आणि शेवटी या दोघांनी एकमेकांना हातही जोडले. त्यानंतर चंद्रकांत पाटलांवर विरोधकांकडून टिक होऊ लागली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीसुद्धा या प्रकरणानंतर भाजप सरकारवर ट्विट करत निशाणा साधला आहे.  

मंत्र्यांनी गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरणं म्हणजे या सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारांच्या मदतीने जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनी हा महाराष्ट्र आहे हे मात्र विसरू नये असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे खासदार पोलिसांना धमक्या देतात, पत्रकारांना धक्काबुक्की करतात, मंत्री गुंडांना भेटतात यालाच  पार्टी_विथ_डीफरन्स म्हणायचं का? आपल्या याच आदरातिथ्यामुळं गुंडाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असून गुन्हेगारी वाऱ्याच्या वेगाने फोफावत चाललीय. गुंडांना राजाश्रय देण्याच्या आपल्या कृत्यामुळं दहशतीखाली असलेली सामान्य जनताच आपल्याला योग्य वेळी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असे ट्विटर वरून सांगितले आहे. 

खरंतर गजानन मारणे गुंड आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जेव्हा पुण्यात पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी पुण्यातील सर्वच गुंडांची त्यांनी परेड काढली होती. त्यात अग्रभागी गजानन मारणे होता. त्यावेळी तो पोलिसांसमोर हात जोडून उभा होता. आणि त्याच गुंडासमोर आता भाजपचे प्रभावी नेते असलेल्या चंद्रकांत पाटलांनी हात जोडल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. खर तर याआधी अनेक राजकारणी गजानन मारणेच्या भेटीसाठी त्याच्या घरी गेले होते. यामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांचा समावेश आहे. मात्र आता पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील गजानन मारणेसमोर हात जोडून उभे असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अवघ्या काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा कोथरूड मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यापूर्वीच या दोघांच्या भेटीचा हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत सापडले आहे.

टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवारchandrahar patilचंद्रहार पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष