Pune Crime | चऱ्होलीत सात वर्षीय मुलावर जंगलात नेऊन केले लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 19:59 IST2023-04-18T19:53:38+5:302023-04-18T19:59:29+5:30

याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला...

A seven-year-old boy was taken to the forest and sexually assaulted in Charholi | Pune Crime | चऱ्होलीत सात वर्षीय मुलावर जंगलात नेऊन केले लैंगिक अत्याचार

Pune Crime | चऱ्होलीत सात वर्षीय मुलावर जंगलात नेऊन केले लैंगिक अत्याचार

आळंदी (पुणे) : सात वर्षीय मुलाला जंगलात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना चऱ्होली (ता. खेड) येथे रविवारी (दि. १६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुजित हरिपाद मलिक (वय ३१) याला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या सात वर्षीय मुलाला रविवारी सायंकाळी चऱ्होली येथील जंगलात नेले. तिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलाने घरी आल्यानंतर हा प्रकार सांगितला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A seven-year-old boy was taken to the forest and sexually assaulted in Charholi