पुण्यात मध्यरात्री कारच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 09:34 IST2024-07-08T09:32:17+5:302024-07-08T09:34:06+5:30

संजोग शिंदे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

A policeman was killed and another seriously injured in a collision with a four wheeler in the middle of the night | पुण्यात मध्यरात्री कारच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी!

पुण्यात मध्यरात्री कारच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी!

नितीश गोवंडे, लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खडकी पोलिस ठाण्याचे, खडकी बाजार परिसरातील बीट मार्शल कर्मचारी संजोग शिंदे आणि पोलिस हवालदार कोळी यांना मध्यरात्री एक वाजून ४० मिनिटांनी सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. हा अपघात खडकी अंडरपास, हॅरिस ब्रिज जवळ घडला. त्यात पोलिस हवालदार कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शिंदे यांची प्रकृती स्थिर असून वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात उपस्थित आहेत. तर गुन्हे शाखेची पथके चारचाकी वाहनासह चालकाचा शोध घेत आहेत.

Web Title: A policeman was killed and another seriously injured in a collision with a four wheeler in the middle of the night