Pune Police: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 15:41 IST2022-07-28T14:04:01+5:302022-07-28T15:41:18+5:30
पुणे पोलीस आयुक्तालयातील शिमला पोलीस ठाण्यात कर्तव्यास होते

Pune Police: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हदीतील कवडीमाळवाडी परिसरात पुणे शहर पोलीस दलात कर्तव्यास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार (२८ जुलै) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
सुनील नारायण शिंदे (वय- ४८, रा. कवडीमाळवाडी, कदमवाकवस्ती, ता. हवेली) बक्कल नंबर ६५७६ असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पुणे पोलीस आयुक्तालयातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कर्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे.
सुनील शिंदे हे बुधवारी संध्याकाळी घरातील एका खोलीत झोपले होते. गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वडील उठले का नाहीत यासाठी आवाज दिला. मात्र खोलीमधून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. यावेळी खिडकीतून पाहिले असता त्यांना सुनील शिंदे यांनी खोलीतील पंख्याला खिडकीच्या पडद्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल घोडके, व पोलीस हवालदार तेज भोसले पोहचले असून पुढील कारवाई सुरु आहे.