Anti Corruption Bureau: पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 10:32 IST2022-07-20T10:26:30+5:302022-07-20T10:32:09+5:30
सागर दिलीप पोमण ( वय-34) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाच्या नाव

Anti Corruption Bureau: पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला
हडपसर : हडपसर पोलीस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रार अर्जात मदत करून अडकलेले पैसे काढून देण्यासाठी पन्नास हजाराच्या लाचेची मागणी केली होती. ती लाच स्वीकारताना एका हॉटेलमध्ये पकडले. सागर दिलीप पोमण ( वय-34) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाच्या नाव आहे.
तक्रारदार यांच्या तक्रारी अर्जामध्ये मदत करण्यासाठी आणि तक्रारदार यांचे आर्थिक व्यवहारांमध्ये अडकलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ती कोरेगाव पार्क येथे एका हॉटेलमध्ये स्वीकारली. त्यावेळी साध्या वेशात सापळा लावलेल्या लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.