पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्याचा काही भाग कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 12:28 IST2022-08-22T12:28:21+5:302022-08-22T12:28:36+5:30

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही..

A part of Lohgad fort in Pune district collapsed pune latest news | पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्याचा काही भाग कोसळला

पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्याचा काही भाग कोसळला

कार्ला (पुणे) :पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घडली. मात्र, दरड कोसळल्यानंतर सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

लोहगड गाव हे लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले असून किल्ल्याला लागूनच गावातील वस्ती आहे. या वस्तीची लोकसंख्या ५०० पेक्षा अधिक आहे. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास दरड कोसळल्याचा आवाज आल्याने नागरिक बाहेर आले. परंतु दरड छोटी असल्याने कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.

मात्र, स्थानिकांनी अलर्ट राहणे गरजेचे असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील सरपंच, ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, प्रशासन पातळीवर प्रयत्न होऊन लोहगड गावाचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: A part of Lohgad fort in Pune district collapsed pune latest news