सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्याचा विहीरीत पडून मृत्यु; जुन्नरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 18:26 IST2022-11-21T18:26:42+5:302022-11-21T18:26:53+5:30
पत्नी विहिरीत पडल्यावर पतीने तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली

सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्याचा विहीरीत पडून मृत्यु; जुन्नरमधील घटना
जुन्नर : सहा महिन्यापूर्वी विवाह झालेले दांपत्य विहिरीत पडून मृत्यूमुखी पडल्याची घटना आदिवासी भागातील कुकडेश्वर (ता. जुन्नर) येथे घडली. या घटनेत सागर बाळू दिवटे व नाजुका सागर दिवटे या नवदांपत्याचा मृत्यु झाला.
या संदर्भात घडलेला प्रकार असा, घराशेजारीच असलेल्या व काठोकाठ भरलेल्या विहिरीवर नाजुका कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी तोल जाऊन नाजुका पाय घसरून विहिरीत पडली. यावेळी सागरने पत्नी नाजुका हीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतल्याचे सांगण्यात येते. अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. विहीरीकाठी गाणी सुरू असलेला मोबाईल व विहिरीत बादली पडल्याचे आढळले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सागरने नुकतेच कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले होते व तो शेतीची कामे करायचा. निर्व्यसनी आणि मनमिळावू असलेला सागर व नाजुका यांच्या आकस्मित मृत्यूमुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.