सिंहगड घाट रस्त्यात चालती मोटार कार गरम झाल्याने घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 08:22 PM2023-01-08T20:22:18+5:302023-01-08T20:22:31+5:30

गाडीतील पर्यटक वेळीच उतरल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही

A motor car running on Sinhagad Ghat road caught fire due to overheating | सिंहगड घाट रस्त्यात चालती मोटार कार गरम झाल्याने घेतला पेट

सिंहगड घाट रस्त्यात चालती मोटार कार गरम झाल्याने घेतला पेट

googlenewsNext

पुणे : सिंहगड घाट रस्त्यात उंबरदांड खिंडीजवळ चालत्या मोटारकार गरम झाल्याने लागलेल्या आगीतकार जळून खाक झाली आहे. गाडीतील पर्यटक वेळीच उतरल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि वनसंरक्षक कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

पर्यटनासाठी सिंहगडावर पर्यटनासाठी सिंहगडावर आज सकाळपासूनच पर्यटकांनी गर्दी केली होती. सकाळी सात वाजता सिंहगडावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. खासदार  सुप्रिया सुळे यांच्या भेटीची चर्चा दिवसभर गडावर पर्यटकांमध्ये होती. यातच सायंकाळी पाचच्या दरम्यान एका पर्यटकाच्या चालत्या गाडीने गडावर जात असताना गडाच्या पार्किंग पासून खाली साधारण एक किलोमीटर अंतरावर पेट घेतला. गाडीतील पर्यटक वेळीच उतरल्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. घटनेची माहिती मिळताच वाहतूक व्यवस्थापनासाठी असलेल्या नितीन गोळे संदीप कोळी संभाजी खाटपे आदी वनसंरक्षण समितीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली गाडी जवळ आग विझवण्यासाठी  कोणतीही यंत्रणा नसल्याने गाडी जळून पूर्ण खाक झाली. गाडीमालकाने अग्निशमन दल आणि पोलिसांची संपर्क साधून घडलेल्या गोष्टीची घटनेची खबर दिली. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत मोटार कार जळून खाक झाली होती.

अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत मोटार कार जळून खाक झाली

शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटक सिंहगडावर पर्यटनासाठी गर्दी करत असतात. आज रविवार असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांची गर्दी होती अशातच सायंकाळी पाचच्या दरम्यान अचानक या चालत्या चार चाकी वाहनाने पेट घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. गाडीला लागलेली आग आटोक्यात न आल्याने चार चाकी गाडी जळून खाक झाली. अग्निशमन दलाला याबाबतची माहिती मिळताच दलाचे एक वाहन घटनास्थळी आले. गर्दीचा दिवस असल्याने  दुतर्फा वाहणांच्या रांगा  लागल्या होत्या. अचानक गाडीने पेट घेतल्याची घटना घडल्याने दोन्ही बाजूच्या वाहतूक थांबवण्यात आली. प्राप्त माहिती नुसार अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत मोटार कार जळून खाक झाली होती.

Web Title: A motor car running on Sinhagad Ghat road caught fire due to overheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.