Pune Crime | जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 14:48 IST2023-01-23T14:46:09+5:302023-01-23T14:48:14+5:30
धायरीतील उंबऱ्या गणपती चौकाजवळ ही घटना घडली...

Pune Crime | जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार
पुणे : एक महिन्यापूर्वी मित्रांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून एका १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रोहित कैलास आढाव (वय १७, रा. किरकटवाडी) याने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी साजन शहा, मयूर पोळेकर, अक्षय वाल्हेकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धायरीतील उंबऱ्या गणपती चौकाजवळ शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी हा केटरिंगचे काम करतो. तो, त्याचा भाऊ रोशन आढाव, मित्र विशाल जाधव व भीमा जाधव हे गप्पा मारत बसले होते. फिर्यादीचा मित्र रोहित राठोड व साजन शहा याचा मित्र प्रशांत कांबळे यांच्यात १ महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साजन शहा याने कोयत्याने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला असता तो हाताने अडविला. हा वार उजव्या हाताच्या बोटावर, मनगटाजवळ, पंज्यावर बसून गंभीर जखमा झाला. सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिव अधिक तपास करीत आहेत.