फेसबुकवरील ओळखीतून विवाहितेला लाॅजवर बाेलावून बलात्कार; पुणे शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 21:19 IST2022-11-30T21:16:54+5:302022-11-30T21:19:05+5:30
भारती विद्यापीठ पोलिसांकडून एकाला अटक...

फेसबुकवरील ओळखीतून विवाहितेला लाॅजवर बाेलावून बलात्कार; पुणे शहरातील घटना
धनकवडी (पुणे) : फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून एका तरुणाने विवाहितेला लाॅजवर भेटण्यासाठी बाेलावून तिच्यावर बलात्कार केला. तिचे अश्लील फोटो काढून तिला वेळाेवेळी ब्लॅकमेल केल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अतुल अशाेक इंदलकर (वय २५, रा. हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात २६ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते नाेव्हेंबर २०२२ यादरम्यान घडलेला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिलेची फेसबुकवरून अतुल इंदलकर याच्याशी ओळख झाली. त्यानंतर तरुणाने महिलेस हांडेवाडी येथे एका हाॅटेलमध्ये भेटण्यास बाेलावून अत्याचार केले. अश्लील फाेटाे काढून तिच्या पतीला व नातेवाइकांना दाखविण्याची धमकी देत असे. यामुळे त्रस्त महिलेने याबाबत महिला सहायक पाेलिस निरीक्षक एस तावडे तपास करत आहेत.