शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

विद्यार्थीनींकडे बघून एकाचे हस्तमैथुन; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 19:14 IST

रात्री उशीरा ९ वाजेपर्यंत मुली तिकडे काय करत होत्या? कुलुगुरूंचा तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींना उलटप्रश्न

पुणे : भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या आहुजाच्या प्रकरणानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या आवारात तीन विद्यार्थीनींकडे बघून एकाने हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन याबद्दल कोणतेही पाऊल उचलत नाही. तोपर्यंत आंदोलन करण्याचे विद्यार्थ्यांनी ठरवले असून ते सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर आंदोलन करत बसले आहेत. 

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या समोर जेवण करून तीन विद्यार्थीनी रिफेक्टरीकडून मुलींच्या हॉस्टेलकडे जात होत्या. त्यावेळी मराठी भाषा विभागाबाहेर एका व्यक्तीने त्यांच्याकडे बघून हस्तमैथुन केले. दोघींनी त्या व्यक्तीला जाब विचारण्यास सुरुवात केली तर एकीने तातडीने आंबेडकर भवनजवळील सुरक्षारक्षकाकडे धाव घेतली. परंतु नंतर तो व्यक्ती पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. 

कुलगुरूंचा विद्यार्थिनींना उलट प्रश्न 

प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्याकडे झालेल्या प्रकाराबाबत विद्यार्थिनींनी तक्रार केली. मात्र त्यांनी हा विषय माझ्या अखत्यारीत येत नसल्याचे उत्तर  दिले. तसेच यासंदर्भात तुम्ही कुलगुरूंना भेटा असे सांगितले असल्याचे विद्यार्थ्यांनी माहिती दिली. विद्यार्थिनींनी कुलगुरूंची भेट घेतली. त्यांना झालेल्या प्रकारची माहिती दिली. मात्र रात्री उशीरा ९ वाजेपर्यंत मुली तिकडे काय करत होत्या. असा उलटप्रश्न कुलगुरूंनी विद्यार्थिनींना केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे. या प्रकाराची विद्यापीठ प्रशासन दखल घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.   

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीagitationआंदोलनSocialसामाजिकWomenमहिला