रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची मोठी कारवाई; पुण्यात १५० लिटर भेसळयुक्त तुप जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 13:53 IST2022-08-11T13:53:36+5:302022-08-11T13:53:45+5:30
कारवाईमध्ये तब्बल १ लाखांचा मुद्देमाल जप्त

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची मोठी कारवाई; पुण्यात १५० लिटर भेसळयुक्त तुप जप्त
पुणे : पुण्यातील कात्रज भागात पोलिसांनी एका गोडाऊनवर छापा टाकत १५० लिटर भेसळयुक्त तुप जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनासोबत पुणे पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिंदर सिंग देवरा असे या व्यक्तीचे नाव असून तो डालडा जे वनस्पती तूप म्हणून ओळखल्या जाते. आणि जेमिनीचे तेल एका केमिकलच्या साह्याने एकत्र करून त्यावर प्रक्रिया करत भेसळ करत होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडून अनेक केमिकल देखील जप्त करण्यात आले असून त्याच्या टेस्टिंगसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. कारवाईमध्ये तब्बल १ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. देवरा यांनी हे भेसळयुक्त तुप कुठल्या दुकानदारांना विकले आहे याची चौकशी सध्या सुरू आहे.