Leopard Attack: आंबेगाव तालुक्यात चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; बापलेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 03:59 PM2023-07-05T15:59:59+5:302023-07-05T16:00:14+5:30

आंबेगाव तालुक्यात वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत

A leopard attacked a moving bike in Ambegaon taluka; Baplek injured | Leopard Attack: आंबेगाव तालुक्यात चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; बापलेक जखमी

Leopard Attack: आंबेगाव तालुक्यात चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; बापलेक जखमी

googlenewsNext

मंचर:मोटरसायकलवरून घरी चाललेल्या बाप-लेकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील लौकी येथे घडली आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून बालमबाल बचावले आहेत. यावेळी तीन बिबटे असल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थानी केला आहे.

आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे.तालुक्यातील चास, कळंब, चांडोली बुद्रुक, लौकी, चांडोली खुर्द या गावांमध्ये आत्तापर्यंत अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. या वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतात कामे करताना देखील दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असते. अनेक वेळा शेतात कामे करण्यासाठी अनेक शेतकरी एकत्र येऊन ग्रुपने शेती कामे करावी लागत आहेत. पाळीव जनावरांचा फडशा बिबट्याने पडला आहे.

मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास कळंब लौकी रस्त्यावर देवराम गणपत थोरात यांच्या विहिरीजवळ सुरुवातीला बिबट्याने दीपक थोरात या दुचाकी स्वरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा हल्ला परतविण्यात दीपक थोरात यशस्वी झाला.मात्र मागून येणारे रविराज धुमाळ व वडील काळूराम धुमाळ (रा. पेठ ता. आंबेगाव) हे मोटरसायकलवर येत असताना रस्त्यातून जाणाऱ्या बिबट्याच्या जोडीने दोघांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात दोघांच्या पायाच्या टाचेला जखमा झाल्या आहेत.

दरम्यान धुमाळ यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक धावून आले. प्रत्यक्ष मदतीला धावून येणाऱ्या नागरिकांनी यावेळेस तीन बिबटे एकत्र पाहिल्याचा दावा केला आहे. त्यातील एका बिबट्याने धुमाळ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु या परिसरातील नागरिक अरडाओरड करत पळत आल्याने त्या बिबट्यांनी धूम ठोकली.दरम्यान धुमाळ बापलेकांवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वनपाल शशिकांत मडके यांनी सांगितले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: A leopard attacked a moving bike in Ambegaon taluka; Baplek injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.