जामीन मिळवून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणारा वकिल जाळ्यात

By विवेक भुसे | Published: December 29, 2023 11:59 AM2023-12-29T11:59:40+5:302023-12-29T11:59:53+5:30

तक्रारदाराच्या मुलाला खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जुन्नर पोलिसांनी अटक करण्यात आली आहे

A lawyer who demanded a bribe of 20,000 to get bail is in the net | जामीन मिळवून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणारा वकिल जाळ्यात

जामीन मिळवून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणारा वकिल जाळ्यात

पुणे : गुन्ह्यात अटक झालेल्या मुलाला लवकर जामीन मिळवून देतो, असे सांगून पोलीस अधिकार्‍याला द्यावे लागतील असे सांगून २० हजार रुपयांची लाच मागणार्‍या वकिलावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल झाला आहे.

शिवम गजानन नायकोडी (वय ३०, रा. जुन्नर) असे या वकिलाचे नाव आहे. लाच मागितल्यानंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणीही झाली होती. मात्र, कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे निधन झाले. त्यामुळे सापळा कारवाई होऊ शकली नाही. परंतु, लाच मागितली गेली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी, तक्रारदार हे ७० वर्षांचे असून त्यांच्या मुलाला खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जुन्नर पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. शिवम नायकोडी हे त्यांचे वकिल होते. त्यांच्या मुलाला लवकर जामीन मिळवून देतो, असे तक्रारदार यांना सांगितले. त्यासाठी तपास अधिकार्‍याला २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार यांना संशय आल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची ९ डिसेंबर रोजी पडताळणी केली असता वकिलाने तपासी अधिकार्‍याला २० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराकडे पंचासमक्ष २० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तक्रारदार यांचे निधन झाल्याने सापळा कारवाई होऊ शकली नाही़ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जुन्नर पोलीस ठाण्यात लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A lawyer who demanded a bribe of 20,000 to get bail is in the net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.