Pune: दारु पिताना झालेल्या वादातून दोघांनी केला कामगाराचा खून

By नितीश गोवंडे | Updated: August 23, 2023 14:48 IST2023-08-23T14:47:12+5:302023-08-23T14:48:57+5:30

लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

A laborer was killed by two people due to a drunken argument pune latest crime | Pune: दारु पिताना झालेल्या वादातून दोघांनी केला कामगाराचा खून

Pune: दारु पिताना झालेल्या वादातून दोघांनी केला कामगाराचा खून

पुणे : दारु पिताना झालेल्या वादातून दोघांनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून केला. ही घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली आहे. शैलेश मांडगीकर (२६) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राम सुभाष श्रीराम (२५, रा. बेरळी बुद्रुक, मुखेड, जि. नांदेड), गोपाल ज्ञानोबा कोटालापुरे (२५, रा. नांदेड नाका, महादेवनगर जि. लातूर) यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगम चंद्रशेखर धारिया (२३, रा. सिधावट खास, कुशीनगर, उत्तरप्रदेश) याने या संदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटलापूरे, धारिया, श्रीराम आणि मांडगीकर हे चौघेही कामगार आहेत. श्रीराम, कोटालापुरे, मांडगीकर बुधवारी रात्री वाघोली-केसनंद रस्त्यावरील सिट्रोन सोसायटीसमोर दारु पित होते. ठेकेदाराने मांडगीकरला श्रीरामच्या सांगण्यावरुन कामावरुन काढल्याने त्यांच्यात वाद झाला. यावेळी मांडगीकरने दारूच्या नशेत श्रीराम आणि कोटलापुरे यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर या दोघांनी मांडगीकरवर तीक्ष्ण शस्त्राने वार करत त्याचा खून केला. याबाबतची माहिती मिळतच लोणीकंद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. पसार झालेल्या आराेपींचा पोलिस शोध घेत असून, याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एम. के. पाटील करत आहेत.

Web Title: A laborer was killed by two people due to a drunken argument pune latest crime