ज्ञानोबा अन् तुकोबांच्या पालखीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; ७ हजारांचा पोलिस फौजफाटा तैनात

By नितीश गोवंडे | Published: June 9, 2023 03:01 PM2023-06-09T15:01:23+5:302023-06-09T15:02:13+5:30

यंदा होणारी विक्रमी गर्दी विचारात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताचे कडेकोट नियोजन

A good arrangement of police for the palakhi of sant dnyaneshwar and sant tukaram A police force of 7 thousand has been deployed | ज्ञानोबा अन् तुकोबांच्या पालखीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; ७ हजारांचा पोलिस फौजफाटा तैनात

ज्ञानोबा अन् तुकोबांच्या पालखीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; ७ हजारांचा पोलिस फौजफाटा तैनात

googlenewsNext

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ड्रोनद्वारे पालखीवर पोलिसांची नजर असणार असून, दिंड्या व पोलिसांच्या समन्वयासाठी दहा दिंड्यासोबत एक वॉकीटॉकी सोबत असलेला कर्चमचारी तैनात असणार आहे. यंदा होणारी विक्रमी गर्दी विचारात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताचे कडेकोट नियोजन केले आहे. पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षकांसह होमगार्ड, एसआरपीएफ, बीडीडीएस पथके आणि स्थानिक पोलिस असा ७ हजारांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत.

१० जून रोजी देहू येथून जगदगुरू तुकाराम महाराज व ११ जून रोजी आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. दोन्ही पालख्यांचे १२ जून रोजी पुण्यात आगमन होणार असून १२ व १३ जून रोजी पालख्या पुण्यात मुक्कामी असणार आहेत. नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे जगदगुरू तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असते, तर भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्कामी थांबणार आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यापासून वाहतुकीचे नियोजन करण्यापर्यंतची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते.

पाटील इस्टेट येथे १२ जून रोजी दोन्ही पालख्यांचे आगमन होईल, यावेळी पालख्यांच्या स्वागतासाठी वारकर्‍यांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. यानंतर येथून दोन्ही पालख्या नियोजनानुसार भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर व नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी असणार आहेत. या ठिकाणीदेखील पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. दोन्ही पालख्या १४ जून रोजी सकाळी सहा वाजता शहरातून बाहेर प्रस्थान करणार आहेत.दरम्यान यावेळी वाहतूक पोलिसांचा देखील स्वतंत्र बंदोबस्त असणार असून नागरिकांना अडचण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

साध्या वेशात गुन्हे शाखेची पथके तैनात...

पालखी सोहळ्यात होणार्‍या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून साध्या वेशात २५० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहे. सराईत चोरट्यांची यादी तयार करून त्यांची फोटोद्वारे माहिती जमा करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास महिला पोलिसांची पथके वारी सोहळ्यात पहारा देणार आहेत. अशी माहिती गुन्हे
शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.

असा असेल पोलिस बंदोबस्त..

पोलीस उपायुक्त  - १०
सहायक पोलीस आयुक्त - २०
पोलीस निरीक्षक - ९७
एपीआय, पीएसआय - ३२८
अंमलदार  -  ३ हजार ४
दोन एसआरपीएफच्या तुकड्या
होमगार्ड - ७००

ड्रोन व जीपीएसद्वारे पालखीचे लाईव्ह लोकेशन आपल्याला समजणार

वारी सोहळ्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्यात आले आहे. दोन सत्रात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ड्रोन व जीपीएसद्वारे पालखीचे लाईव्ह लोकेशन आपल्याला समजणार आहे. - रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

Web Title: A good arrangement of police for the palakhi of sant dnyaneshwar and sant tukaram A police force of 7 thousand has been deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.