Pune: ‘घरच्यांना शूट करून टाकेन’, म्हणत तरुणीवर चार वर्षांपासून अत्याचार

By नितीश गोवंडे | Updated: February 5, 2024 13:45 IST2024-02-05T13:45:19+5:302024-02-05T13:45:41+5:30

हा प्रकार ऑक्टोबर २०१९ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत पीडित मुलीच्या घरी, बिबवेवाडी, गोकुळनगर आणि कात्रज येथे घडला आहे...

A girl was tortured molested for four years saying 'I will shoot the family' | Pune: ‘घरच्यांना शूट करून टाकेन’, म्हणत तरुणीवर चार वर्षांपासून अत्याचार

Pune: ‘घरच्यांना शूट करून टाकेन’, म्हणत तरुणीवर चार वर्षांपासून अत्याचार

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून मुलगी अल्पवयीन असल्यापासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका २४ वर्षीय तरुणावर बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१९ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत पीडित मुलीच्या घरी, बिबवेवाडी, गोकुळनगर आणि कात्रज येथे घडला आहे.

याबाबत धनकवडी येथे राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीने रविवारी (दि. ४) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रकाश हंसाराम चौधरी (२४, रा. खराडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १५ वर्षांची असल्यापासून आरोपी प्रकाश चौधरी याला ओळखते. आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्या घरी जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर ‘मी तुला व तुझ्या घरच्यांना शूट करुन टाकीन’ अशी धमकी देऊन तिच्यासोबत गैरवर्तन केले. आरोपीने मुलीला वेळोवेळी बोलवून घेत तिला बिबवेवाडी, कात्रज परिसरातील लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने लग्नास नकार दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलीने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकम या करत आहेत.

Web Title: A girl was tortured molested for four years saying 'I will shoot the family'