पुण्यात दारू पिण्याच्या वादातून डोक्यात दगड घालून मित्राचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 10:16 IST2022-08-09T10:13:24+5:302022-08-09T10:16:07+5:30

डोळ्याच्या बाजूला व कपाळावर दगडाने....

A friend was killed by a stone on his head due to an argument over drinking in Pune | पुण्यात दारू पिण्याच्या वादातून डोक्यात दगड घालून मित्राचा खून

पुण्यात दारू पिण्याच्या वादातून डोक्यात दगड घालून मित्राचा खून

पुणे : दारू पिताना झालेल्या वादात डोक्यात दगड घालून मित्राचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनिल राजू सासी (वय ३३, रा. इंदिरानगर वसाहत, वैदवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी त्याचा भाऊ अक्षय राजू सासी (वय २५, रा. इंदिरानगर वसाहत, वैदवाडी, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण नामदेव नाईक (वय ४१, रा. पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा) याला अटक केली आहे. हा प्रकार वैदवाडी कॅनॉलजवळ २ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घडला होता.

अधिक माहितीनुसार, प्रवीण आणि अनिल हे दोघे मित्र होते. ते दोघे वैदवाडी कॅनॉलजवळील नर्मदाबाई कांबळे शाळेच्या मागे दारू पिण्यास बसले होते. तेव्हा त्यांच्यात भांडण झाले. त्याचा राग मनात धरून प्रवीण याने अनिल याच्या डोळ्याच्या बाजूला व कपाळावर दगडाने मारले. त्यात अनिल हा गंभीर जखमी झाला होता. त्याला ससून रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात समावेश करून प्रवीण नाईक याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक डांगे तपास करीत आहेत.

Web Title: A friend was killed by a stone on his head due to an argument over drinking in Pune