एका कॉलने राजधानी ते पुणे हादरले, अखेर उघडकीस आला बुधवार पेठेतील धक्कादायक कट…' तोही बनावट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:38 IST2026-02-10T11:37:45+5:302026-02-10T11:38:26+5:30

हॉटेल मालकाला अडचणीत आणण्यासाठी वेटरने कामावरून काढल्याच्या रागातून दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट रचला

A call shook the capital to Pune, the shocking conspiracy in Budhwar Peth was finally revealed...' That too is fake! | एका कॉलने राजधानी ते पुणे हादरले, अखेर उघडकीस आला बुधवार पेठेतील धक्कादायक कट…' तोही बनावट!

एका कॉलने राजधानी ते पुणे हादरले, अखेर उघडकीस आला बुधवार पेठेतील धक्कादायक कट…' तोही बनावट!

पुणे : दिल्लीतील ऐतिहासिक चांदणी चौक… गजबजलेला परिसर… आणि ८ फेब्रुवारीची दुपार. अचानक दिल्लीपोलिसांच्या कंट्रोल रूमला आलेल्या एका गूढ फोनने संपूर्ण यंत्रणा हादरली. फोन करणाऱ्याने जे सांगितले, त्याने केवळ दिल्लीच नाही, तर थेट पुणेही अलर्ट मोडवर गेले!

“चांदणी चौकात बॉम्बस्फोटाचा कट पुण्यात रचला गेला आहे. बुधवार पेठेतील एका हॉटेलमधून हा कट आखण्यात आला असून, हॉटेल मालकाला यासाठी तब्बल २० कोटी रुपये देण्यात आले आहेत… आणि त्याच्या घरी अजूनही आरडीएक्स चा बॉक्स आहे!” फोनवरील या सनसनाटी माहितीने पोलिसांची झोप उडवली. माहितीची गंभीरता लक्षात घेत दिल्ली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता एनआयएला सतर्क केले. काही मिनिटांतच संपूर्ण राजधानीतील सुरक्षा यंत्रणा हालचालीत आल्या. दिल्लीहून थेट पुणे पोलिस आयुक्तालयाशी संपर्क साधण्यात आला. ‘पुणे कनेक्शन’ समोर येताच स्थानिक पोलिसही तात्काळ कामाला लागले.

सायबर पथकाकडून कॉल ट्रेस होताच पुण्यातील एका घरापर्यंत तपास पोहोचला. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाड टाकत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. काही तास चौकशी सुरू होती… आणि हळूहळू संपूर्ण कथानकाला अनपेक्षित वळण मिळाले! चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. कॉल करणारी व्यक्ती ही कोरोना काळात बुधवार पेठेतील त्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती. मात्र, विचित्र वर्तनामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. याच रागातून आणि सूडबुद्धीने हॉटेल मालकाला अडचणीत आणण्यासाठी त्याने हा खोटा बॉम्बस्फोटाचा कट रचला!

इतकेच नाही, तर संबंधित व्यक्तीची मानसिक स्थितीही स्थिर नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापूर्वीही त्याने पोलिसांना दिशाभूल करणारे फोन केल्याच्या तक्रारी नोंदवल्या होत्या. अखेर, दिल्ली ते पुणे सुरक्षा यंत्रणांची काही तासांची धावपळ करणारा ‘बॉम्बस्फोटाचा कट’ हा केवळ एका माथेफिरू व्यक्तीने केलेला खोटा कॉल असल्याचे स्पष्ट झाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, एका फोनने निर्माण केलेला थरार आणि शेवटी उघड झालेला प्रकार याने यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडवली.

Web Title : फर्जी बम धमकी कॉल से दिल्ली, पुणे में हड़कंप; वेटर का बदला निकला।

Web Summary : पुणे के रेड-लाइट इलाके से शुरू हुई एक झूठी बम की धमकी ने दिल्ली में दहशत फैला दी। एक असंतुष्ट पूर्व वेटर ने अपने पूर्व नियोक्ता से बदला लेने के लिए कॉल किया। पर्दाफाश होने से पहले इस अफवाह से पूरे शहर में अलर्ट जारी कर दिया गया।

Web Title : Fake bomb threat call rocks Delhi, Pune; waiter's revenge revealed.

Web Summary : A false bomb threat, originating from Pune's red-light district, triggered panic in Delhi. A disgruntled ex-waiter, seeking revenge on his former employer, made the call. The hoax caused a city-wide alert before being exposed.