पुण्याच्या नऱ्हे भागात ड्रेनेजमध्ये पडला दुचाकी स्वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:32 IST2025-01-12T13:32:18+5:302025-01-12T13:32:46+5:30
दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्याने दुचाकी वरून रस्ता शोधत बाहेर पडत असतानाच दुचाकी गाडी उलटली आणि गाडी सहित ड्रेनेज मध्ये पडला.

पुण्याच्या नऱ्हे भागात ड्रेनेजमध्ये पडला दुचाकी स्वार
- किरण शिंदे
पुणे -पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट असलेल्या नऱ्हे गावातील रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजची काम सुरू आहेत. ड्रेनेज काम सुरू असल्याने रस्ते काही ठिकाणी बंद केले आहेत. या भागात शैक्षणिक संस्था आहे, तसेच खासगी कंपन्या आहेत. विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने या परिसरातून जातात.
दरम्यान, ड्रेनेज काम सुरू असल्याने रस्ते काही ठिकाणी बंद केल्यानंतर दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्याने दुचाकी वरून रस्ता शोधत बाहेर पडत असतानाच दुचाकी गाडी उलटली आणि गाडी सहित ड्रेनेज मध्ये पडला. किरकोळ जखमी झालेल्या दुचाकी स्वराला आणि गाडी स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नऱ्हेतील ड्रेनेज लाईन साठी विधानसभा निवडणुकीपूर्वीच दोन कोटी रुपये निधी मंजूर केला होता.मात्र त्यानंतर निवडणुका आल्यामुळे आचारसंहितेमुळे काम ठप्प होते. आता काम सुरू झाला आहे मात्र वाहतूक कोंडी आणि रस्ते बंद असल्यामुळे नागरिक मिळेल त्या रस्त्याने बाहेर पडत आहेत.त्यातच हा अपघात झाला आहे.